गुर्जर समाजाचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवा

0

अमळनेर। गुर्जर समाजाला एैतिहासिक पार्श्‍वभूमी लाभली आहे. समाजाचा इतिहास घराघरात पर्यंत पोहचविण्यासाठी गुर्जर समाज बांधवांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. गुर्जर समाजबांधवांनी समाजाचा इतिहास घराघरापर्यत पोहोचवावे असे आवाहन नॅनोतज्ञ प्रा.डॉ.एल.ए.पाटील यांनी केले. अमळनेर येथे दोडे गुर्जर बोर्डिंग येथे 8 वा आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस साजरा करण्यात आला. गुर्जर दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाचा फतृतीय तीथी ही गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज गुर्जर यांची जयंती देशभरातील गुर्जर समाजातील गावागावात आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस म्हणून साजरा करण्यात येत असते.

समाज बांधवांची उपस्थिती
यंदा आठवे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिन होते. भाद्रपद शुक्ल तृतीयाचे निमित्त साधून अमळनेर दोडे गुर्जर बोर्डिंग भवनात आंतरराष्ट्रीय गुर्जर दिनाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष व विशस्त मंडळांनी केले. त्यात अमळनेर शहरातील गुर्जर बांधवांसह तालुक्यातील पाडळसरे, निम, कलाली, पढावद व तांदळी येथील गुर्जर बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोर्डिंगचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार गुर्जर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून रमण गुरूजी, बळीराम सुर्यवंशी, पंडित गुर्जर आदी होते.

सरदार पटेल यांचे प्रतिमापूजन
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजा मिहीर भोज गुर्जर व सरदार पटेल यांची प्रतिमापुजन करण्यात आले. प्रा.डॉ.धनंजय चौधरी यांनी मिहीर भोज गुर्जर यांचा जिवन पट व इतिहासातील गुर्जर साम्राज्याची नोंदी विषद केल्या. यावेळी डॉ.एल.डी.पाटील, राजेंद्र पवार, अ‍ॅड.राजेंद्र चौधरी, जी.आर.पाटील, सी.आर.पाटील, समाधान पवार, मुकदास पाटील, वसंतराव पाटील, ह.भ.प अंबादास चौधरी, श्रीकृष्ण पाटील, अ‍ॅड.पद्माकर पाटील, अ‍ॅड.अंकुश पाटील, विवेक पवार, संदेश पाटील, गोपाल पाटील, भोरटेक येथील राजेंद्र चौधरी, समाज बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे सचिव सी.एस.पाटील यांनी तर आभार वसंतराव पाटील यांनी व्यक्त केले.