चोपडा प्रतिनिधी । अकुलखेडा येथील गिरीराज लॉन्सवर गुर्जर समाजातर्फे गुरगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनील मंगल गुर्जर, शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा इंदिरा पाटील, जळगाव जिल्हा दोडे गुर्जर समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, उपाध्यक्ष अशोक जाधव, सचिव डॉ. राधेश्याम चौधरी, सर्व संचालक, प्रा. डॉ. डी. आर. पाटील, डॉ. एल. ए. पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोरख पाटील, जिल्हा परिषद आरोग्य सभापती दिलीप पाटील, अॅड. जी. के. पाटील, विजय पाटील (धुळे), अशोक पाटील (सुरत), शिवाजीराव पाटील, उपसभापती नंदकिशोर पाटील, कैलास पाटील, पी. जे. पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी ना. पाटील म्हणाले की, गुर्जर समाज शिक्षण घेऊन देशात नव्हे तर जगात पोहचला आहे. आपणही गाव पातळीपासून ते मंत्रालयस्तरावर पोहोचल्याने निश्चित राजकारणात पदवी मिळवली आहे. खरंतर आपला माणूस जिथे जातो तेथे ठसा उमटत असतो. यावेळी प्रशस्तिपत्र देऊन मुलांचा सत्कार करण्यात आला. तसेच नव्याने निवड व पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांचे सत्कार देखील करण्यात आले. दहावी व बारावीमध्ये ८० टक्क्याच्यावर गुण प्राप्तसोबत एमबीबीएसला प्रवेश प्राप्त मुलाचा सत्कार केला. कार्यक्रम यशस्वितेसाठी दोडे गुर्जर संस्थानचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.