गुर्जर समाजाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

0

90 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला

सांगवी : येथील श्री गुर्जर क्षत्रिय कडिया समाजाच्यावतीने जुनी सांगवी परिसरात रक्तदान शिबिराचे आयेजन करण्यात आले होते. पिंपरी सिरॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँकेच्या सहकार्याने 90 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवुन रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. संकलित झालेले रक्त शासकीय यंत्रणेकडे सुपुर्द करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष हरिश टंक यांनी सांगितले. याचबरोबर वाढत्या उन्हात तहान भागविण्यासाठी प्रियदर्शनी प्रमुख रस्त्यावर बसविण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बिपिन मनानी, भरतभाई परमार, संजय चौटालिया, बिपिन चव्हाण, कांतीभाई राघवानी आदी समाज बांधव उपस्थित होते. पिंपरी सिरॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बँकेचे डॉ. सदानंद नाईक, डॉ. संतोष कांबळे, दीपक पाटील, संतोष कदम आदींनी योगदान दिले.