रावेर। देशातील गुर्जर समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, अशी समाजाची अनेक वर्षांपासून मागणी आहे यासाठी माझे सहकारी पाठपुरावा करीत आहे. गुर्जर समाजाला ओबीसी आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार अनुकूल आहे, ओबीसी आरक्षण केंद्र सरकार लवकरच देईल, असे आश्वासन राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. रावेर येथील गुर्जर स्नेहवर्धक मंडळाच्या मंगल कार्यालय भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
गरीब घटकाला मंगल कार्यालयाचा उपयोग
यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन आदी उपस्थित होते. पुढे सहकारमंत्री गुलाबराव पाटील बोलतांना सांगितले की, गुजर समाज चांगले प्रबोधनाचे काम करत असून समाजातील गरीब घटकाला लग्न तसेच विविध कार्यासाठी मंगल कार्यालयाचा उपयोग होणार आहे. समाजाच्या लोकांनी सदैव चांगले काम करीत रहावे, असे आवाहनही गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी तालुकाभरातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
समाज मंगल कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, आमदार हरिभाऊ जावळे, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, राजीव पाटील, भागवत पाटील, जिल्हा परिषद सदस्य नंदा पाटील, रंजना पाटील, डी.के.महाजन, आर.के.पाटील, माजी नगरसेवक शीतल पाटील, गुर्जर समाज अध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय चौधरी, सचिव एस.आर.महाजन, महेंद्र पाटील, डॉ. प्रवीण चौधरी आदी उपस्थित होते.