जळगाव :श्री गुलाबरावजी देवकर फौउंडेशनच्या वतीने जळगाव ग्रामीण मतदार संघातील सुसक्षित बेरोजगार युवकांसाठी दि. ८ संप्टेबर रोजी जळगावात गुलाबराव देवकर आभियांत्रिकी महाविदयालयात तर दि. ९ संप्टेबर रोजी धरणगावात इंदिरा गांधी विदयालयात भव्य नौकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात मुंबई , पुणे , नाशिक , औरंगाबाद येथिल ४० च्या वर मॅनुफॅक्चरीग , फार्मसी , फायनान्स , रिटेल , इंन्शुरस , हॉस्पिटॅलीटी , बॅकींग , टेलीकॉम , आय.टी. क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. पाचवी पास = नापास पासून तर पदवी , पदवीत्तर , डिग्री , डिप्लोमा धारक उमेदवारांची आपल्या शैक्षणिक पांत्रता व अनुभवानुसार प्रत्येक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. उमेदवारांची नाव नोंदणी जळगाव व धरणगाव येथे सुरु आहे. या शिवाय http://gulabraodeokarfoundation.com/ या संकेत स्थळावर देखिल नाव नोंदणी करता येणार आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी आपल्या बायोडाटाच्या पाच प्रती , पासपोर्ट साईज फोटो , मुळ कागद पत्रके सोबत आणावीत .तरी जळगाव ग्रामिण मतदार संघातील जास्तीत जास्त तरुणांनी या संधीच्या लाभ घ्यावा , असे आवाहन माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर यांनी केले आहे.