गुलाबराव देवकर यांची चोपडा सूत गिरणीला भेट

0

चोपडा प्रतिनिधी । माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आज चोपडा तालूका शेतकरी सहकारी सुतगिरणीस सदिच्छा भेट देत प्रकल्पा बाबत माहिती घेतली.

याप्रसंगी सुतगिरणीचे चेअरमन माजी आमदार कैलास बापू पाटील यांनी पुष्पगुच्छ देत देवकर यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी सुतगिरणीत प्रत्येक्ष पहाणी करत अत्याधुनिक यंत्र सामुग्री , कच्चा माल , उत्पादन प्रक्रिया ,बाजारपेठ अश्या विविध घटकांबाबत माहिती उपस्थितांकडून जाणून घेतली. यावेळी सुतगिरणीचे संचालक अशोक पाटील , वेळोदाचे माजी सरपंच रमाकांत पाटील, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील, प्रफूल्ल पाटील आदी मान्यवरांसह सूत गिरणीचा कर्मचारीवृंद उपस्थित होता.