पाळधी। खानदेशाची मुलख मैदान म्हणून ओळख असलेले महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते नामदार गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस सोमवारी 5 रोजी सर्वत्र साजरा केला जात आहे. शेतकर्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नेहमीच अग्रेसर असल्याने जिल्ह्यात त्यांची विशेष ओळख आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष कार्यकर्ते व पदाधिकार्यांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव तालुका, धरणगाव तालुक्यातील विविध ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या वाढदिवसाचे मुहुर्त साधुन विविध विकास कामांचे भुमिपूजन देखील केले जात आहे.
पाळधी येथे वृक्षारोपण: नामदार गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाळधी येथील खाटकी वाडा ते राष्ट्रीय महामार्गापर्यत सकाळी 10 वाजता वृक्षारोपन केले जाणार आहे. महाराष्ट्र ऑटो जवळ भाजीपाला मार्केट येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे लाडुतुला करण्यात येणार आहे. पाळधी येथील शाम कॉलनी येथे पेव्हर ब्लॉकच्या कामाचे भुमिपूजन होणार असून नव्याने पोलीस उपनिरीक्षक परिक्षा पास झालेल्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. वह्या, हेल्मेट वाटप होणार आहे.
विकास कामांचे भूमिपुजन: धरणगांव नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचे भुमिपूजन राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणार आहे. 9 लाख लिटर पाण्याच्या टाकी बांधकाम, महात्मा गांधी उद्यान ते छत्रपती शिवाजी पुतळ्या पर्यत नविन पाईप लाईन टाकणे, सोनवद स्मशानभूमी अद्यावत करणे आदी कामांचे भुमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी संपर्क प्रमुख रविंद्र मिर्लेकर, जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.