जळगाव : मी मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय, तुम्ही शिंदे साहेब आणि जळगाव जिल्ह्यातील शिंदे साहेबांच्या समर्थक आमदारांच्या विरोधात खूप बोलताय, तुम्हाला सोडणार नाही, अशा शब्दात एकाने व्यक्तीने आपल्याला फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी जळगावातील प्रसिद्धी माध्यमांना शनिवारी आक्रोश मोर्चा संपल्यानंतर दिली.
पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करणार
शनिवारी जळगाव शहरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा होता. साधारण दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गुलाबराव वाघ हे आपल्या समर्थकांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आक्रोश मोर्च्यात सहभागी झाले. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय, तुम्ही शिंदे साहेब आणि जळगाव जिल्ह्यातील शिंदे साहेबांच्या समर्थक आमदारांच्या विरोधात खूप बोलताय, तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही कुठेही भेटलात तर तुम्हाला सोडणार नाही, अशा शब्दात धमकी दिली. त्यावर वाघ यांनी देखील समोरच्याच्या व्यक्तीला जोरदार प्रतिउत्तर देत समोर येऊन बोला, असे सांगितले. तसेच आपण याची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे सायंकाळी तक्रार करणार असल्याचेही वाघ म्हणाले.