गुलाबवाडीच्या तरुण विवहितेची आत्महत्या

0

रावेर- तालुक्यातील गुलाबवाडी येथील 19 वर्षीय विवाहीत महिलेने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. ज्योती धारसिंग चव्हाण (19) असे मयत विवाहितेचे नाव आहे. घरात कुणीही नसताना या विवाहितेने काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. आठ महिन्यांपूर्वीच ज्योती हिचा विवाह झाला होता. याबाबत रावेर पोलिसात अकास्मत मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पाढळेे करीत आहेत.