40 वर्षीय पीडित महिलेने नोंदविली फिर्याद
राजगुरूनगर : गुळाणी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप नामदेव ढेरंगे यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 40 वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.
दमदाटीही केली
याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित महिला ही गावातील एका व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जात होती. त्यावेळी सरपंच दिलीप ढेरंगे यांनी पाठीमागून हात पकडून ‘तुझ्या नवर्याला काय अख्खा गावाला जेलमध्ये टाकीन’, असे म्हणत असभ्य वर्तन केले. ढेरंगे यांनी दमदाटीदेखील केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात दिलीप ढेरंगे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आदित्य लोणीकर करत आहेत.