मुंबई: आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, गृहखात्याविषयी अजित पवार यांनी खुलासा केला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाबद्दल स्थानिकांशी झालेल्या चर्चेदरम्यान अजित पवारांनी गृह खाते आपल्याकडे असल्याचे वक्तव्य केल्याची चर्चा रंगली होती. मात्र आपण असं कोणतही वक्तव्य केलं नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. सोलापूर येथे जि.प अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यावेळी अजित पवार यांनी काऱ्यांना दम दिल्याची चर्चा होती
अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना गृह खात्याचा संदर्भ देत दम भरल्याचे वृत्त समोर आल्यानंतर रविवारी संध्याकाळी त्यांनी बैठकीमध्ये नक्की काय घडलं याबद्दलची माहिती दिली. “अडीच वर्षांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरुन सोलापूरच्या नेत्यांनी शरद पवारांना दिलेला शब्द पाळला नव्हता. याचीच मी या बैठकीमध्ये आठवण करुन दिली. यावेळी तरी आपण आपल्यातील एकी दाखवूया असं आवाहन मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना केलं, असं अजित पवार यांनी सांगितलं.
मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. त्यामुळे माझ्याकडे कोणतेही खातं नसल्यामुळे मी गृह खात्याचा विषय काढून सोलापूरमधील स्थानिक नेत्यांना दम भरण्याचा विषयच येत नाही. मी केवळ सर्व नेत्यांना एकत्र राहण्याचं आवाहन केले असल्याचा खुलासा अजित पवार यांनी प्रकरणावर पडदा टाकताना म्हणाले.