जळगाव। जळगाव शहरातील रिधूर वाड्यात राहणार्या बंगाली कारागिराच्या घरात घसून अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून 48 लाख रुपये किमतीचे 2 किलो 111 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लुटल्याचा प्रकार 17 जून 2015 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडला होता. यानंतर काही महिन्यातच पोलिसांकडून तपास बंद करण्यात आल्याने पोलिसांनी योग्य तपास केला नसल्याचा आरोप करीत बंगाली कारागिराने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने गृहमंत्रालय, नाशिक विशेष पोलिस महानिरीक्षक, जळगाव पोलिस अधीक्षक आणि शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षकांना नोटीस बजावली आहे. त्यात 13 एप्रिलपर्यंत न्यायालया खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
चाकूचा धाक दाखवून लूटले 2 किलो 111 गॅ्रम सोने
रिधूर वाड्यात प्रधान यांच्या मालकीचे दागिने घडविण्याचे दुकान आहे. 17 जून 2015 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास पाच तरूण पुलक यांच्या दुकानात घुसले. त्या पैकी एकाने विचारले ‘गुरू भाईका दुकान कौनसा है ।’ बाजूला असल्याचे सागिंतले. तोपर्यंत एकाने दरवाचा बंद केला. त्यानंतर सर्वांनी मोठे सुरे काढून दुकानातील सपन प्रधान, सिंबास मांझी, शिवशंकर जाना, पसन्नजीत माहिती यांच्या मानेला लावले. त्यानंतर चौघांचे हात बांधून तोंडावर गम्प्लासच्या पट्ट्या चिटकविल्या. स्वयंपाक घराकडे जाण्यासाठी असलेला पडदा कापून त्याच्या छोटे तुकडे करून सर्वांच्या डोळ्यावर बांधले. त्यानंतर दुकानातील 750 ग्रॅम सोन घेतले. त्यानंतर बाजूला असलेल्या ब्लॉक क्रमांक 7 मध्ये गुरूदेव माहिती यांच्या दुकानाचा दरवाजा ठोठावला. त्यांनी ‘हम नाशिक इनकमटॅक्स डिपार्टमेंट से आये है।’ असे सांगून आत शिरले. त्यानंतर त्या ठिकाणी गुरुदेव माहिती, सोमेन पांजा व कारागीरांना चाकूचा धाक दाखवून 2 किलो 111 ग्रॅम सोने लुटून नेले होते.
13 एप्रिलपर्यंत खुलासा सादर करण्याचे आदेश
शनिपेठ पोलिसांनी 31 जानेवारी 2016 रोजी आरोपी सापडत नसल्याचा अहवाल पाठवून तपास बंद केला होता. याच्या विरोधात गुरूदेव माहेती यांनी 7 ऑक्टोबर 2016 रोजी औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती के. के. सोनवणे आणि न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठात गृहमंत्रालय, विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक, पोलिस अधीक्षक आणि शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी 24 मार्च रोजी उच्च न्यायालयाने सर्वांना नोटीस पाठविली आहे. त्यात 13 एप्रिलपर्यंत सर्वांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.