गृहमंत्री अमित शहा आजपासून जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

0

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आजपासून पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरचा दौरा करत आहे. पुढील दोन दिवस त्यांचा जम्मू-काश्मीर दौरा असणार आहे. या दौऱ्यात ते काश्मीरमधील सद्यपरिस्थिती आणि तेथील फुटिरतावाद्यांची भूमिका यासंदर्भात माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. अर्थससंकल्प लक्षात घेऊन हा दौरा लवकर आयोजित करण्यात आला आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात अमित शाह हे उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तसेच काश्मीरमधील भाजपा नेते आणि पंचायत समिती सदस्यांनाही ते मार्गदर्शन करणार आहेत. तर, राज्यपाल सत्यपाल मलिक यांचीही भेट ते भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.