नवी दिल्ली । अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर देशभर हाय अलर्ट जारी करण्यात आला. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत तातडीची उच्चस्तरीय बैठक पार पडली. राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी अमरनाथ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सव्वा तास चर्चा झाली. या बैठकीत गुप्तचर यंत्रणेचे संचालक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, गृहसचिव, केंद्रीय गृहमंत्रालयाचे अधिकारी हजर होते.
विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवा, ओमर अब्दुल्लांची मागणी
नवी दिल्ली । जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्याचवेळी त्यांनी देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये शिकणार्या काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ल्याची भीतीही व्यक्त केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशभरातील काश्मिरी विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवण्याचं आवाहन त्यांनी केले आहे.
मुद्यावर चर्चा
दहशतवाद्यांविरोधात जॉईंट ऑपरेशन करुन त्यांचा खात्मा करावा. सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम सुरु केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. नोंदणीकृत नसलेल्या गाड्या आणि भाविकांवर यात्रेदरम्यान नजर ठेवावी. सूत्रानुसार, अमरनाथ यात्रेची सुरक्षा व्यवस्था अधिक सुदृढ करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचे आदेश गृहमंत्रालयाने सीआरपीएफला दिले आहेत. सुरक्षेची पाहणी करुन राजनाथ सिंह यांना अहवाल सादर करतील.