गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विभागात भाजपा आक्रमक

प्रशासनाला ठिकठिकाणी दिले निवेदन : महिन्याला शंभर कोटी मागणार्‍या अनिल देशमुखांविरोधात जोरदार घोषणाबाजी

भुसावळ : पोलिस अधिकार्‍यांना मुंबईतून दरमहा 100 कोटींच्या वसूलीचे टार्गेट देणार्‍या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपातर्फे भुसावळ विभागात आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भुसावळात गृहमंत्री अनिल देशमुखांच्या विरोधात भाजपतर्फे निदर्शने
भुसावळ :
गृहमंत्री देशमुखांच्या विरोधात तीव्र निदर्शने करुन त्यांनी तत्काळ राजीनामाची मागणी आमदार संजय सावकारे, शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी आदींनी केली.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी आरोप केले आहे. सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेल्या पत्रात देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, असा दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. यामुळे भाजपने आक्रमक होऊन देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शहरातील आमदार संजय सावकारेंसोबत भाजपच्या पदाधिकार्‍यांनी गांधी पुतळ्याजवळ देशमुख यांच्या विरोधात तीव्र निदर्शन आंदोलन केले. त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी आमदार सावकारे यांनी केली. या प्रसंगी ओबीसी सेलचे माजी प्रदेश चिटणीस अजय भोळे, माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी, अजय नागराणी, सतीश सपकाळे, नगरसेवक राजेंद्र नाटकर, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील महाजन, अ‍ॅड.प्रकाश पाटील आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रावेरात भाजपाचे आंदोलन
रावेर :
आघाडी सरकारच्या काळात विकासकामे ठप्प झाली असून आघाडी सरकारच्या खंडणी वसुली करणार्‍या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा व त्यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी रावेर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कचेरीच्या आवारात जोरदार घोषणाबाजी देवून भ्रष्ट शासनाचा निषेध केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, सरचिटणीण महेश चौधरी, महेश चौधरी, तालुका उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे, जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल पाटील, शहराध्यक्ष दिलीप पाटील, पंचायत समितीम सदस्य योगीता वानखेडे, जुम्मा तडवी, हरलाल कोळी, संदीप साळवे, मनोज श्रावगे, तालुका युवा अध्यक्ष महेंद्र पाटील, रवींद्र पाटील, शुभम पाटील यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

गृहमंत्र्यांनी द्यावा राजीनामा : यावलमध्ये भाजपा पदाधिकारी आक्रमक
यावल :
पोलिसांकडून शंभर कोटींची दरमहा मागणी करणार्‍या गृहमंत्री अनिल देशमुख यांचा यावलमधील भाजपा पदाधिकार्‍यांनी निषेध करीत त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा पदाधिकार्‍यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली. खंडणीखोर देशमुखांनी राजीनामा न दिल्यास तालुका भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा येथील तालुुका भाजपाच्या वतीने येथील तहसील कार्यालयात भारती भुसावरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

यांची निवेदनावर स्वाक्षरी
निवेदनावर जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र पाटील, जि.प.सदस्या सविता अतुल भालेराव, हिरालाल व्यंकट चौधरी, नगरसेक डॉ.कुंदन फेगडे, सभापती पल्लवी चौधरी, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, जि.प.चे माजी सदस्य हर्षल पाटील, विलास चौधरी, उज्जैनसिंग पाटील, उपसभापती योगेश भंगाळे, निलेश गडे, उमेश पाटील, योगराज भंगाळे, अनंत नेहेते, योगेश साळुंखे, रामभाउ होले, व्यकंंटेश बारी, अतुल भालेराव, साहेबराव बडगुजर, विजय मोरे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

वरणगावात आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाची घोषणाबाजी
वरणगाव :
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे याच्याकडून दर महिन्याला शंभर कोटी हप्त्याची मागणी केली होती, असा दावा माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रात केला असून या गंभीर प्रकारानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी वरणगावात भाजपा पदाधिकार्‍यांनी महामार्गावर आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिस प्रशासनाने भाजपा कार्यकर्त्यांना अटक केली.

यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, शहराध्यक्ष सुनील माळी, सरचिटणीस गोलू राणे, कुंदन माळी, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई, महिला मोर्चा अध्यक्षा प्रणिता पाटील, चौधरी, ज्येष्ठ नेते मनोहर सराफ, शामराव धनगर, माजी सरपंच सुभाष धनगर, भाजपा शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, युसूफ खान, गजानन वंजारी, मिलिंद भैसे, गंभीर माळी, आकाश निमकर, तेजस जैन, डॉ.प्रवीण चांदणे, भाऊलाल टिंटोरे, पप्पू ठाकरे, शंकरअण्णा पवार, कमलाकर मराठे, कृष्णा माळी, संदीप माळी, जावेद शाह, अंकुश साबळे, प्रशांत बावणे, जिगर पालवे, योगेश काळे, रमेश पालवे, छोटू सेवातकर, दीपक चौधरी, राहुल जंजाळे, अनिकेत चांदखेडकर यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक गणपुरे, सहा.निरीक्षक संदीप बोरसे यांनी पोलीस बंदोबस्त राखला.