अहमदनगर प्रकरणी दबाव आणत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
मुंबई :- अहमदनगर येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी खोटे गुन्हे दाखल करून नगरसेवक कैलास गिरवले यांना अटक करण्यात आली. त्यांचा मृत्यू पोलीस कोठडीतच झाला असल्याचा आरोप करत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या दबावात पोलीस काम करत आहेत त्यामुळे केसरकर यांचे पद काढून घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
अहमदनगर येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या दुहेरी हत्या प्रकरणी खोटे गुन्हे दाखल करून राष्ट्रवादीचे नगरसेवक कैलास गिरवले यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी संबंधित पोलिसांना निलंबित करून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी. पोलिसांनी ही हत्या घडवून आणली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.