कर्ज वसुली ३ महिने स्थगित करण्याचा बँकांना सल्ला
नवी दिल्ली । कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून, जागतिक मंदीची जबरदस्त लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आव्हानात्मक परिस्थितीतून तरून जाण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज महत्त्वपूर्ण उपाययोजनांची घोषणा केली. रेपो दरात कपात हा निर्णय त्यापैकी एक आहे. यामुळे गृह व वाहन कर्ज स्वस्त होणार आहे. तसेच पुढील ३ महिने कर्जवसुली स्थगित करण्याचा सल्ला बँकांना देण्यात आला आहे.
शक्तिकांत दास काय म्हणाले,
- जीडीपीचे अपेक्षित उद्दिष्ट गाठणे आव्हानात्मक
- आरबीआयच्या उययोजनांमुळे ३ लाख ७४ हजार कोटी रुपये मार्केटमध्ये येतील.
- रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात. यामुळे रेपो दर ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आला आहे.
- अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात.
- रिव्हर्स रेपो दरातही ०.९० टक्क्यांची कपात
- रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे.
- कर्जाची वसुली (ईएमआय) ३ महिने स्थगित करण्याचा बँकांना सल्ला