वासिंद : उंबरमाळी-कसारा येथील रेल्वे गॅगमन मनिराम सखाराम व मुकादम सखाराम ढामसे यांनी कर्तव्यदक्षतेने संभाव्य रेल्वे दुर्घटना टाळल्याबद्दल कल्याण- कसारा- कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे वासिंद येथे सत्कार करण्यात आला. 20 जुलै रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास उंबरमाळी- कसारा रेल्वे मार्गावर रूळाला 17 इंचचा तडा गेल्याचे गॅगमन मनिराम सखाराम यांच्या निदर्शनास आल्याने ताबडतोब त्यांनी मुकादम ढामसे यांना कळवले होते. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कसारा स्थानक उपप्रबंधकानी लोकल गाडी व मेल एक्सप्रेस थांबविण्यात आल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली होती.
वासिंदमध्ये पार पडला कार्यक्रम
गॅगमनच्या कर्तव्यदक्षतेची दखल रेल्वे प्रशासनाने घ्यावी, यासाठी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव, सचिव श्याम उबाळे, उपाध्यक्ष मंगेश पाटील यांनी कर्मचार्यांचा सन्मान केला. कार्यक्रमात प्रमुख सल्लागार, चंद्रकात जाधव, सहसचिव राहूल दोंदे, महिला प्रतिनिधी प्राजक्ता साळवी, संतोष शितोळे, सुहास जगताप, सचिन घेगडे, सचिन जाधव यांनी सत्कार मुर्तीं विषयी कृतज्ञता व्यक्त केली. वासिंद स्थानकात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला वासिंद शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.