नवी दिल्ली । आपल्या एकापेक्षा एक भारी आविष्कारांनी जगभरातील मोबाइलप्रेमींची मनं जिंकलेल्या सॅमसंगचा गॅलेक्सी नोट 8 हा हायटेक फोन आज भारतात लॉन्च झाला आहे. आजघडीला जे जे अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्या सर्व फीचर्सनी खच्चून भरलेल्या या फोनची किंमत किती असेल, हीच खरी उत्सुकता होती. ती कंपनीने 67,900 रुपये इतकी जाहीर केली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 साठी प्री-बुकिंग आजपासून सुरू झालंय. 21 सप्टेंबरपासून त्याची विक्री सुरू होणार आहे. हा फोन लगेचच खरेदी करणार्या ग्राहकांना ’लॉन्च ऑफर’ म्हणून एक वायरलेस चार्जर आणि एकदा स्क्रीन रिल्पेसमेंटची वॉरेंटी देण्यात आलीय. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी करणार्या ग्राहकांना 4 हजार रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे.