अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात सात रुपये वाढ करण्यात आली आहे. सरकारने दरमहा दरवाढीचे धोरण स्वीकारले असून, गेल्या वर्षी जुलैपासून अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 68 रुपये वाढ झाली आहे. विनाअंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 73.5 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, तो आता 597.50 रुपयांवर गेला आहे. जून 2016मध्ये अंशदानित गॅस सिलिंडरचा दर 419.18 रुपये होता. केंद्र सरकारने अंशदानित गॅस सिलिंडरवरील अंशदान टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत दर महिन्याला दरवाढ करण्यात येत आहे. स्वयंपाकाच्या अंशदानित 14.2 किलोच्या सिलिंडरचा दर दिल्लीत आता 487.18 रुपये झाला आहे. याआधी तो 479.77 रुपये होता, अशी महिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिली. प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 12 सिलिंडर अंशदानित दराने देण्यात येत आहेत. त्यापुढील सिलिंडर बाजारभावाने खरेदी करावे लागत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून देण्यात येणार्या केरोसीनच्या दरात प्रती लीटर 25 पैसे वाढ करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी जुलैपासून केरोसीनच्या दरात दर पंधरवड्याला 25 पैसे वाढ करण्यात येत आहे. केरोसीनचा दर आता प्रती लीटर 22.27 रुपये झाला आहे. जुलै 2016 रोजी केरोसीनचा दर प्रती लीटर 15.02 रुपये होता. विमान इंधनाच्या दरात चार टक्के म्हणजेच प्रती किलोलीटर 1 हजार 910 रुपये वाढ करण्यात आली आहे. याआधी प्रती किलोलीटर 48 हजार 110 रुपये असलेला दर आता 50 हजार 20 रुपयांवर गेला आहे. विमान इंधनात 1 ऑगस्टला 2.3 टक्के वाढ करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या काळात अनेकवेळा विविध जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ होत असून जनतेने नवा भारत घडवण्यासाठी थोडी कळ सोसावी, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करीत आहेत. जनता महागाई किती दिवस सहन करणार हा मोठा प्रश्न आहे. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानासरकार जनतेवर महागाई लादत असल्याचे दिसून येते. हे सरकार व्यापारीधार्जिणे असल्याची टीका विरोधक वारंवार करतात, त्यात काय वावगे आहे, असे वाटत नाही. आता स्वयंपाकाच्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात सात रुपये वाढ करण्यात आली आहे. सरकारने दरमहा दरवाढीचे धोरण स्वीकारले असून, गेल्या वर्षी जुलैपासून अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 68 रुपये वाढ झाली आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 73.5रुपयांनी वाढ करण्यात आली असून, तो आता 597.50 रुपयांवर गेला आहे. सन 2016 मध्ये अनुदानित गॅस सिलिंडरचा दर 419.18रुपये होता. केंद्र सरकारने अनुदानित गॅस सिलिंडरवरील अनुदान टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत दर महिन्याला दरवाढ करण्यात येत आहे, असे सरकारचे धोरण ठरलेले आहे. स्वयंपाकाच्या अनुदानित 14.2 किलोच्या सिलिंडरचा दर दिल्लीत 487.18 रुपये झाला आहे. यापूर्वी तो 479.17 रुपये होता, अशी महिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिली आहे.
– विशाल मोरेकर
जनशक्ति प्रतिनिधी,मुंबई
9869448117