गॅस एजन्सीतून चोरट्यांनी 45 हजारांची रोकड लांबवली

Bold Theft in Pal Gas Agency: Cash Of 45 Thousand Was Delayed रावेर : तालुक्यातील पाल येथील भारत गॅस एजन्सीच्या कार्यालयातून चोरट्यांनी 45 हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गॅस एजन्सीत चोरीने खळबळ
पाल येथील चैतन्य भारत एजन्सीचे संचालक लालचंद सरीचंद चव्हाण यांच्या तक्रारीनुसार पाल गावातील गॅस एजन्सीचे कुलूप तोडून 26 रोजी मध्यरात्री कार्यालयातून 45 हजारांची रोकड लंपास केली. तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत.