Chocante! : Ladrões estenderam o oleoduto no valor de dezoito lakhs do Esquema de Irrigação Varangaon-Talvel Upsa भुसावळ : ओझरखेडा धरण ते दीपनगर केंद्रादरम्यानची वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेची तब्बल 11 लाख 66 हजार 131 रुपये किंमतीची पाईप लाईन चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता फुलगाव-तळवेल-ओझरखेडा गावठाण जमिनीवर तब्बल 18 लाख रुपये किंमतीची पाईप लाईन चोरट्यांनी गॅस कटरद्वारे लांबवल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सन 2012 ते 20 ऑगस्ट 2022 दरम्यान ही चोरी झाल्यानंतर संबंधित विभागाला जाग आल्याने आश्चर्य व्यक्त होत असून या विभागाचा कारभारही उघड झाला आहे.
गॅस कटरचा वापर करीत लांबवली पाईप लाईन
मौजे तळवेल, फुलगाव व ओझरखेडा शिवारात वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेची पाईप लाईन अंथरण्यात आली असून चोरट्यांनी 2012 ते 20 ऑगस्ट 2022 दरम्यान केव्हातरी संधी साधून तब्बल तीन हजर 600 किलो वजनाची व 14 मिलिमीटर जाडीची पाईप लाईन गॅस कटरचा वापर करून लांबवल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल दहा वर्षांच्या कालावधीत हा प्रकार घडल्यानंतर संबंधित विभागाने गुरुवारी वरणगाव पोलिसात तक्रार दाखल केल्याने या विभागाचा कारभार उघड झाला आहे. तळवेल उपसा सिंचन बांधकाम विभागाचे शाखा अभियंता तुषार रामचंद्र राजपूत (28, खोटेनगर, जळगाव) यांनी वरणगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी 12 लाखांच्या पाईप-लाईनची चोरी
पिंप्रीसेकम शिवारातील गावठाण जमिनीवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकिची ओझरखेडा धरण ते दीपनगर केंद्रादरम्यानची 863 मेट्रीक टन वजनाची व 11 लाख 66 हजार 131 रुपये किंमतीची पाईप लाईन चोरट्यांनी 15 जुलै ते 20 ऑगस्टच्या दरम्यान केव्हातरी लांबवली होती. य या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.