भोसरी : घरगुती वापराच्या सिलेंडर मधून गॅस गळती होऊन आज लागल्याची घटना भोसरी एमआयडीसी मध्ये घडली. कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या पत्राशेडमध्ये आज संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
प्राथमिक माहितीनुसार, क्वालिटी सर्कल मराठा चेंबर येथील पत्राशेडमधील कामगारांनी गॅस शेगडीचे बटन चालू ठेवल्याने या ठिकाणी गॅस गळती झाली. त्यातून या पत्राशेडला आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाचे जवान दलाच्या कृष्णा कदम, बजरंग पवार, गौतम इगवले, होवाळे, पुंडलिक भुतापल्ले, संभाजी दराडे यांनी दहा मिनिटात आग आटोक्यात आणली. या आगीत पत्राशेड जळून खाक झाले.