गॅस गळती स्फोटात वृद्ध दाम्पत्य जखमी

0

पिंपरी-चिंचवड : गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात वृद्ध दांपत्य गंभीररीत्या भाजले आहे. बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे ही घडली. प्रभाकर नगरकर (वय 60) आणि आशा नगरकर (वय 58) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

पिंपळे गुरवमधील घटना
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नगरकर पिंपळे गुरवमध्ये ओम साई सृष्टी चौकात एका चाळीवजा घरात राहतात. त्यांचे घर एकाच खोलीचे आहे. काल रात्री स्वयंपाक झाल्यानंतर गॅस सुरूच राहिला. जेवण झाल्यानंतर दोघेही झोपले. मध्यरात्री प्रभाकर लघुशंकेसाठी उठले. दरम्यान, गॅस संपूर्ण घरात पसरला होता. त्यांना याबाबत कल्पना आली नाही. त्यांनी घरातील दिवा सुरू केला. त्यावेळी लिकेज झालेल्या गॅसचा स्फोट झाला. यामध्ये नगरकर दांपत्य गंभीररित्या भाजले.

रात्री गॅस राहिला सुरू
शघटनेची माहिती पावणेएकच्या सुमारास अग्निशमन विभागाला समजली. माहिती मिळताच तात्काळ वल्लभनगर अग्निशमन विभागाचे दोन आणि रहाटणी अग्निशमन विभागाचा एक असे एकूण तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले. राहटणी अग्निशमन विभागाचे भाऊसाहेब धराडे, विकास नाईक, चिपळूणकर यांच्या पथकाने आग तात्काळ नियंत्रणात आणली. आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.