मुंबई। सर्वसामान्यांच्या रोजच्या वापरातील गॅसची झालेली दरवाढ सत्ताधारी भाजपसाठी अडचणीचा विषय ठरत आहे. विरोधकांनी समाजमाध्यमांचा वापर करत भाजप नेत्यांनी केलेल्या काँग्रेस सत्ताकाळातील महागाईविरोधी आंदोलनांची आठवण करुन दिली आहे. तसेच त्यावेळची छायाचित्रेही व्हायरल केली आहेत.
सरकारी इंधन कंपन्यांनी बुधवारी घरगुती वापराच्या विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 86 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना प्रति सिलिंडरमागे 89 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. जागतिक दरवाढीनंतर बुधवारी ही दरवाढ करण्यात आली.
ज्या ग्राहकांचा वर्षभरात 12 अनुदानित सिलिंडर्सचा कोटा पूर्ण होतो त्यांना आणि ज्यांनी अनुदान नाकारले आहे अशा सर्वांना या गॅस दरवाढीचा फटका बसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहना अनुदान त्यागाच्या आवाहनानंतर सुमारे एक कोटी नागरिकांनी स्वेच्छेने अनुदान नाकारले होते. ते तसेच तसेच ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांहून अधिक आहे अशी घरे या अनुदानास पात्र नाहीत, त्यामुळे त्या सर्वांना दरवाढीचा फटका बसणार आहे.
बुधवारी विरोधकांनी नेमका दरवाढीच्या मुद्द्यावर खिंडीत गाठण्याचा प्रयत्न सुरु केला. भाजप नेत्यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळात केलेल्या महागाईविरोधी आंदोलनांची छायाचित्र समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केली गेली.