गॅस सिलिंडर महागले!

0

नवी दिल्ली : अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 8 रुपयांनी आणि विना अनुदानित सिलिंडर 74 रुपयांची दरवाढ झाली आहे. नवे दर शुक्रवारपासून लागू झाले. दिल्लीमध्ये अनुदानित सिलिंडर 487.18 रुपयांना मिळणार आहे. दरवाढीपूर्वी त्याची किंमत 479.77 रुपये होती.

केंद्र सरकारने अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात मार्चपर्यंत दर महिन्याला 4 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. दर महिन्याला वाढ करुन सरकार मार्च 2018 पर्यंत घरगुती वापराच्या सिलिंडरवरील अनुदान बंद करण्याच्या विचारात आहे. केंद्र सरकारने गेल्यावर्षी सरकारने तेल कंपन्यांना घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्याला 2 रुपयांनी वाढवण्याचे आदेश दिले होते, मात्र आता ते 2 रुपयांवरुन दर महिन्याला 4 रुपये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.