गॅस सिलेंडर चोरीप्रकरणी 23 वर्षांपासून मोकाट फिरणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

0

वरणगाव। गेल्या अनेक वर्षांपासून गॅस सिलेंडर चोरीप्रकरणी फरार असलेला आरोपी लक्ष्मण रामदास कोल्हे (वय 70, राहणार जगदंबा नगर, वरणगाव) यांनी सन 1993 मध्ये मनमाड गॅस गोडावून फोडून गॅस सिलिंडरची चोरीप्रकरणी 9 रोजी सकाळी राहत्या घरुन वरणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लक्ष्मण रामदास कोल्हे आयुध निर्माणी वरणगाव सेवानिवृत्त कर्मचारी होता. त्याने मनमाड येथील गॅस गोडावून फोडून गॅस सिलेंडरची चोरी केली होती. या प्रकरणी सन 1993 मध्ये नाशीक ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सदर आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी नुकताच वरणगाव पोलिस स्टेशनचा पदभार घेताच त्यांनी या प्रकरणातील चौकशी हाती घेतली.

सदर अरोपी एका दुकानावर बसल्याची खबर मिळाली असता एपीआय जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील वाणी, नागेंद्र तायडे आदींनी सापळा रचून अनेक वर्षांपासून मोकाट असलेल्या आरोपी लक्ष्मण कोल्हे यांना शिताफीने अटक करून नाशिक ग्रामीण पोलिसाच्या ताब्यात दिले. या घटनेसंदर्भात एपीआय जगदीश परदेशीचे कौतुक केले जात आहे.