जळगाव । गेंदालाल मिल परिसरात गावठी दारू विक्री करणार्या दोन जणांवर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी कारवाई करून त्यांच्या ताब्यातून सुमारे 20 लिटर दारू हस्तगत केली आहे. गेंदालाल मिल परीसरातील रहिवासी कूंदन बनसोडे हा त्याच्या घराजवळ गावठी दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाला असता पथकाने घटनास्थळी जावून संशयीतास रंगेहात पकडले तसेच त्याच्या ताब्यातील 400 रूपये किंमतीची दहा लिटर देशी दारू हस्तगत केली.
तर दुसर्या घटनेत याच परीसरातील रहिवासी जितेंद मसाणे यांच्या कडून देखिल 400 रूपये किंमतीची दहा लिटर दारू कॅन मधुन हस्तगत केली. या घटनेसंदर्भात पोलिस कर्मचारी चौधरी व मोहसिन बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयीतांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणीचा पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे हेकॉ.कांबळे हे करीत आहेत.