गेंदालाल मिल परिसरात तरूणाला बेदम मारहाण

0

जळगाव । शहरातील गेंदालाल मिल परिसरातील एका तरुणाला पुर्व वैमनस्यातुन मारहाण केली. ही घटना रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शिवाजीनगर परिसरात गेंदालाल मिल आहे. गेंदालाल मिल परिसरात रईस शेख हा तरुण राहतो. रईसचा लहान भाऊ सलमान शेख याचे दोन वर्षापूर्वी पल्ल्या नामक तरुणाशी भांडण झाले होते. दरम्यान पल्ला हा त्याचा मित्र भुषण सोनवणे याच्यासोबत दारुच्या नशेत होता. नशेत असल्याने इकबाल भंगारवाला यांच्या घरासमोर भूषण सोनवणे व पल्ल्या यांनी रईसला मारहाण केली. शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केल्याने रईस यांना मुका मार लागला. त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर रईस यांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यानुसार या मारहाणी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच मारहाण करणार्‍यांचे पोलिस शोध घेत आहे.