जळगाव : शहरातील गेंदालाल मिल भागातील तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
किरकोळ कारणावरून मारहाण
नरेश मांगीलाल विश्वकर्मा (30) हा शिवाजी नगरात भुरेमामलेदार प्लॉट येथे राहतो. गेंदालाल मिल भागातील रेणुका माता मंदिर परिसरात गुरुवार्रें 3 मार्च रोजी उभा असतांना, तू या भागात फिरू नको असे म्हणत अल्ताफ, वसीम व बाबा (तीन्ही रा.गेंदालाल मिल, पूर्ण नाव माहीत नाही) या तिघांनी नरेश विश्वकर्मा यास शिविगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तू जर गेंदालाल मिल भागात फिरला तर जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. याप्रकरणी शुक्रवार, 4 मार्च रोजी नरेश विश्वकर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरूध्द शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे.