गेम ऑफ थ्रोन या अमेरिकन मालिकेचे पुढील भाग लिक झाल्याने धक्का बसल्याने स्टार इंडियाने चौकशी सुरू केलेली आहे. या मालिकेचे भारतातील प्रसारण हक्क स्टार इंडियाकडे आहेत.
स्टार या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करणार आहे. शुक्रवारी गेम ऑफ थ्रोन सिझन ७ चा चौथा भाग प्रसारित होणार होता. परंतु त्याआधीच तीन दिवसांपूर्वी रेडिट साईटवर तो प्रसारीत झाला. आधी हॅकर्सने दिड टेराबाईट डाटा निर्माती असलेल्या एचबीओ वाहिनीकडून चोरल्याचा संशय होता. मात्र लिक झालेल्या फिल्मवर स्टार इंडियाचा वॉटरमार्क होता, असे व्हर्ज या नियतकालिकाने म्हटले आहे. रेडिटचा थ्रेड गुगल ड्राईव्ह पोस्टला जोडलेला आहे.
हा भाग साईटवर दाखविल्यानंतर मुंबई सायबर क्राईम सेलकड अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. स्टार इंडिया आणि एचबीओ मध्ये डिसेंबर २०१५ मध्ये करार झाला होता. गेम ऑफ थ्रोन, व्हीप, सलिकॉन व्हॅली, ट्रू डिटेक्टीव्ह या मालिका प्रसारित करण्याचे अधिकार स्टार इंडियाला देण्यात आले होते. स्टार इंडिया आपली चॅनेल आणि हॉट स्टार हा व्हीडिओ स्ट्रीमिंग प्लाटफॉर्म हे शो प्रसारित करण्यासाठी वापरतो. गेम ऑफ थ्रोन्सचे भाग अमेरिकेत दाखवून झाल्यावर काही मिनिटातच भारतात दाखविले जातात. मालिकांचे स्पॉइल्स ऑफ वॉर हे पायरेटेड व्हर्जन आहे. २०१५ मध्येही गेम ऑफ थ्रोनचे भाग लिक झाले होते.