गेली 100 वर्षे समुद्र गिळतोय शहर

0

शहरे बुडण्याचे प्रकार आपल्याला कृष्णाची द्वारका नगरी आणि तामिलनाडुतील महाबलिपूरम परिसरातील 10 हजार वर्षांपूर्वी बुडालेल्या शहरामुळे कदाचित माहित असतील. असाच प्रकार दक्षिण अमेरिकेतील एका शहराच्या बाबतीत घडत आहे. गेली 100 वर्षे हे शहर बुडवण्यास समुद्राने सुरूवात केली आहे.

मेक्सिको खाडीमध्ये दक्षिण अमेरिकेतील लुसियाना राज्यात डेलाक्रोइक्स शहर आहे. समुद्राचे पाणी हळू हळू या शहराला बुडवत आहे. त्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. गेल्या 100 वर्षात लुसियाना राज्यातील या शहराची 1800 स्क्वेअर मैल जमिन पाण्याखाली गेली. या शहराला वाचवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या पण समुद्र काय थांबणार. अंदाचे 17 स्क्वेअर मैल जमिन दर वर्षी समुद्र गिळंकृत करीत आहे. 11 वर्षांपूर्वी इथे एक कैतरीना नावाचे भयंकर वादळ आले होते. त्या वेळी 1800 लोक मृत्युमुखी पडले होते. येथील मच्छीमारांनीही स्थलांतर केले.