गेल्यावर्षीचा बदला घेण्यासाठी भूसुरूंग स्फोट: नक्षलवादी संघटना

0

गडचिरोली: गेल्या १ मे रोजी गडचीरोलीतील जांभुळखेडा येथील झालेल्या भूसुरुंग स्फोटावर नक्षलवाद्यांनी प्रतिक्रिया देत, गेल्यावर्षी कसनासूर बोरियामध्ये झालेल्या चकमकीचा बदला घेण्यासाठी हा स्फोट घडवला असल्याचे पत्रक नक्षलवाद्यांनी जिल्ह्याच्या विविध भागात फेकले आहेत. १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात १५ जवान ठार झाले होते.

नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल समितीने हे पत्रक काढले असून, जवानांवर यशस्वी हल्ला केल्या प्रकरणी नक्षलवाद्यांच्या कॅडर संघटनेने अभिनंदन केले आहे. जनसंघर्ष अधिक तीव्र करण्याचे आव्हान त्यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

गेल्या वर्षी कसनासुर बोरिया आणि नैनर येथे दोन चकमकीत ४० नक्षलवाद्यांना ठार केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी दरवर्षी या भागात प्रतिरोध सप्ताह पाळला जातो. या सप्ताहात जांभुळखेड्यात हा स्फोट घडवून आणला गेला.