गेल्या पाच वर्षांपासून मोड येथील शेतकरी चालवित आहे पाणपोई

0

तळोदा। अ नेक व्यक्ती, राजकीय पक्ष व स्वयंसेवी संस्था प्रसिद्धी मिळविण्याकरिता वाजा गाजा करत सार्वजनिक ठिकाणी पाणपोई लावीत असतात. परंतु काही दिवसापूरतेच पाणपोईच्या माठात पाणी असते, पाणपोई कधी बंद होते हे ही कुणाला कळत सुद्धा नाही. मात्र मोड येथील शेतकरी मानक पाटील यांनी निस्वार्थीपणाने मागील 5 वर्षांपासून वाटसरूंची तृष्णा भागवण्याचे कार्य करीत आहे आणि या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. तळोदा तालुक्यातील बोरद हे सर्वात मोठे गाव आहे. बोरद येथे बाजार भरत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात बाजार करण्यासाठी येथे येतात. 44 अंश पेक्षा अधिक ऊन असल्याने जिव्हाची लाही लाही होत आहे. मोड ते बोरद या 4 की.मी. रस्तावर अनेकदा पायीपीठ करणारे प्रवासी, गुरे चारणारे, शेतमजुरी करणारे या रस्त्याने प्रवास करतात.

तहानलेल्याला पाणी पाजणे मोठे काम
आमच्या शेतजवळ झाडे असल्याने अनेकदा वाटसरू त्या झाडाच्या सावलीच्या थांबत होते. आलेल्या वाटसरू अनेकदा पिण्याच्या पाण्याच्या शोधत शेतात देखील येत होते. सदर बाबा निदर्शनास आल्यानंतर झाडाखाली पाण्याचे माठ ठेवले तर वाटसरुची तहान भागेल हा विचार मनात आला. मागील 4 ते 5 वर्षांपासून सदर पाणपोई चालवीत आहे. यामुळे एक वेगळे आत्मिक समाधान मिळत असून, तहानलेल्याना पाणी पाजणे यापेक्षा मोठे कार्य नसल्याचे मानक पाटील यांनी जनशक्ति शी बोलताना सांगितले.

स्वखर्चाने आणतात माठ
रस्ता अंतर्गत कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे वाटसरुंची जिव्हाची लाही लाही होते. प्रवाशांसह अनेकांना हॉटेल सह दुकानाचा आधार घेवून विकतचे पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. हे लक्षात घेत भर उन्हा तान्हात येणार्‍या वाटसरूची तहान भागावी हा उदात्त हेतू मनात ठेवून मोड येथील मानक गोपाळ पाटील यां शेतकर्‍याने आपल्या शेताच्या बाणावर स्व खर्चाने दोन माठ आणून पाणपोई सुरू केली आहे. मागील 5 वर्षा पासून स्वतः मानक पाटील ही पाणपोई निस्वार्थी पणाने चालवत आहे.

अखंडपणे पाणीवाटप सुरू
गुढीपाडवापासून या पाणपोईला कुठलाही वाजा गाजा न करता माठ आणून ठेवले जातात, त्या दिवसापासून नित्यनियमाने दररोज सकाळी दुपार व संध्याकाळ या तीनवेळा ते न चुकता मानक भाई पाण्याचे माठ भरतात, अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होत असला तरी, पाणपोईतील माठ पाण्याने भरण्यात आज पावेतो खंडन झाले नसल्याचे परिसरातील जनतेकडून सांगण्यात येते. पाऊसाळ्याचे एक दोनदा पाऊस पडे पावेतो हे नित्यनियमाने सुरू असते. या पाणपोईमुळे उन्हातून येणार्‍या वाटसरुची तहान भागात असून, माणक पाटील यांचे आभार मानत आहे.