गेहलोत यांच्या निकम्मा, नकारा विधानावर सचिन पायलटांचे प्रत्युत्तर, सांगितले…

0

नवी दिल्ली: राजस्थानमधील राजकारणाला आता पूर्णविराम लागण्याची चिन्हे आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे बंड थंड झाले आहे. त्यांची कॉंग्रेसवापसी झाली आहे. काल राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा कॉंग्रेसमध्ये सक्रीय होऊन अशोक गेहलोत यांना समर्थन देणार असल्याचे स्पष्ट केले. या राजकीय सत्ता संघर्षात सचिन पायलट कधीही माध्यमांसमोर आले नाही. आज पहिल्यांदा ते जाहीरपणे माध्यमांसमोर आले. प्रथमच त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर टीका करताना ‘निकम्मा’ ‘नकारा’ या शब्दाचे वापर केले होते. यावर सचिन पायलट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. व्यक्तिगत टीका करतांना वापरलेल्या शब्दामुळे दु:ख होते, मलाही दु:ख झालेले आहे. मात्र अशोक गेहलोत हे माझ्या वडिलांसारखे असून त्यांनी वापरलेल्या शब्दाबद्दल मी प्रतिक्रिया देणार नाही. मी माझ्या परिवाराकडून चांगले संस्कार घेतले आहे. मोठ्यांचे आदर करावे, कोणाबद्दल वाईट शब्द न वापरणे हे संस्कार माझ्यावर झालेले आहे असे सांगत अशोक गेहलोत यांना टोलाही लगावला. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणे माझा अधिकार आहे असेही त्यांनी सांगितले.

सचिन पायलट यांची कॉंग्रेसवापसी झाल्यानंतर ते आता अशोक गेहलोत यांच्याशी कशा प्रकारे जुळवून घेतील हा प्रश्न आहे. कारण गेल्या दोन महिन्यात अनेक आरोप-प्रत्यारोप झालेले आहे, त्यातून संबंध ताणले गेलेले आहे.