गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिस चौकीची गरज

0

आमदार जगताप यांचे प्रतिपादन

चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये दिवसेंदिवस गैरप्रकार वाढत आहेत. पोलिसांवर हल्ले होत आहेत, लहान मुलींचे शोषण, खुन, दरोडे सर्वच प्रकार वाढल्याने येथील कायदा व सुव्यवस्था बिघडू लागली आहे. त्यासाठी गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस चौकीची उभारणी केली आहे, त्याचबरोबर आम्ही आमचा शब्द पाळला असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप केले. वाल्हेकरवाडी येथे पोलीस चौकी व आठवडी बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी गटनेते एकनाथ पवार, चिंचवड वाहतुक विभागाचे निरीक्षक संजीव पाटील, विलास मडेगरी, नगरसेवक नामदेव ढाके, मोना कुलकर्णी, तुषार कामठे, श्यामराव वाल्हेकर, तुषार कामठे, अमोल थोरात, सुरेश भोईर, अभिषेक बारणे, बाळासाहेब ओव्हाळ, शिक्षण मंडळाचे उपसभापती नाना शिवले, सचिन चिंचवडे, मोरेश्‍वर शेंडगे, शीतल शिंदे, बाळासाहेब ओव्हाळ, गजानन चिंचवडे उपस्थित होते.

आरक्षणे तातडीने मार्गी लावणार
अनधिकृत बांधकामाच्या प्रश्‍नावर बोलतांना जगताप पुढे म्हणाले की, आरक्षण असणारे बांधकामे पाडली जाणार आहेत. जे आरक्षणबाधित नसतील त्यांचे नियमित करण्याची प्रक्रिया सुलभ करून ती नियमित कशी होतील यावर विचार चालू आहे. त्याचबरोबर परिसरातील शाळा, स्मशानभूमी, उद्याने इ. ची आरक्षणे आहेत ती तातडीने मार्गी लावण्याचे काम करत आहोत.

खूप प्रलंबित प्रश्‍न
यावेळी नगरसेवक सचिन चिंचवडे म्हणाले की, पोलीस चौकी व्हावी हा खूप दिवसांपासूनचा प्रलंबित प्रश्‍न होता. आता नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. प्राधिकरणाकडुन जागा विकत घेऊन मार्गी लावला. परिसरातील नागरिकांना आणखी काय सोयीसुविधा पुरवता येतील या गोष्टीचा प्रशासन दरबारी आम्ही पाठपुरावा करत आहोत. त्याचबरोबर प्रभागातील नागरिकांना निरोगी भाजीपाला मिळावा यासाठी आठवडी बाजाराचे सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शिवले यांनी तर प्रास्ताविक नामदेव ढाके यांनी केले आभार सचिन चिंचवडे यांनी मांडले.