गैरवर्तनाचा ठपका : भुसावळ बाजार समिती संचालक निवृत्ती पाटील अपात्र

0

भुसावळ- कृषी उत्पन्न बाजार समितीचे सांलक संजय निवृत्ती पाटील यांना सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी अपात्र केले आहे. या संदर्भात कृउबाच्या सभापतींनी तक्रार केली होती तर 12 संचालकांनी त्याबाबत प्रतिज्ञापत्रदेखील सादर केले होते. 6 जानेवारी 2016 रोजी झालेल्या सभेत पाटील यांनी लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप होता तर या संदर्भात तक्रार केल्यानंतर त्याची खातरजमा केल्यानंतर याबाबत निर्णय देण्यात आला.