भडगाव (प्रतिनिधी) — भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील निरागस बालीकेची निर्घृण हत्या करणार्या नराधमावर कठोर कार्यवाही करण्यात यावी. या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होण्याकरीता शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवावी. या बालीकेला न्याय दयावा. या मागणीचे निवेदन जळगाव जिल्हा परदेशी, राजपुत समाजामार्फत भडगाव तहसिलदारांना देण्यात आले. व या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.भडगाव तहसिलदारांना निवेदन देतांना परदेशी, राजपुत समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश कोंडु परदेशी, समाजाचे भडगाव तालुकाध्यक्ष हरी लालचंद परदेशी , भडगाव माजी तालुकाध्यक्ष अशोक महादु परदेशी , समाजाचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष भगवान रघुवीर परदेशी , रमेश भरतसिंग परदेशी भडगाव, गोविंद शिवलाल परदेशी बाणगाव, अभय हरी परदेशी भडगाव यांचेसह समाजाचे पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी, हरी परदेशी, अशोक परदेशी, भगवान परदेशी, रमेश परदेशी, गोविंद परदेशी, अभय परदेशी आदिंच्या सहया आहेत.