गोंदिया : गोंदिया – आमगाव राज्य महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. मोरेश्वर हीरालाल कटरे (वय २८) आणि प्रवीण कुंभरे अशी यातील मृतांची नावे आहेत.
गोंदिया – आमगाव राज्यमार्गावरील खमारी गावाजवळील नाल्याजवळ बुधवारी सकाळी ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिली. वळण असल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. ट्रकमध्ये लोखंडी सळ्या होत्या. तर ट्रॅक्टरमध्ये वाळू होती. या अपघातात ट्रक आणि ट्रॅक्टरच्या चालकाचा मृत्यू झाला. मोरेश्वर हीरालाल कटरे (वय २८) आणि प्रवीण कुंभरे अशी या चालकांची नावे आहेत. तर राजेन्द्र भोंडे हा गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूकीवर काही काळ परिणाम झाला होता.