गोंदियामध्ये कारच्या धडकेत पती-पत्नी ठार

0

गोंदिया – गोंदियामध्ये भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी ११.३० च्या सुमारास गोंदिया-तिरोडा मार्गावरील अदानी विद्युत प्रकल्पाच्या गेट क्रमांक तीनसमोर हा अपघात घडला.

दुचाकीस्वार हे तिरोडा तालुक्यातील गुमाधावडा येथील असून ते गुमाधावडावरून जमुनिया येथे जात होते. दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.  दरम्यान तिरोडा पोलिसांनी घटनास्थळी पोहचत कारचालकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.