गोंधळी समाजाने घडवून आणला आदर्श पुनर्विवाह

0

पुनर्विवाह करुन समाजाचे सर्वच स्तरातुन कौतुक

चाळीसगाव । शहरातील नेताजी चौक स्थित परिसरात असलेल्या रेणुका माता मंदिरात आदर्श असा पुनर्विवाह नुकताच उत्साहात पार पडला. गोंधळी समाजात पुनर्विवाह होत नाहीत, परंतु जुन्या पिढी अन् परंपरांना फाटा देऊन उभयतांचा पुनर्विवाह करुन समाजाने क्रांतीकारी निर्णय घेतल्याने या निर्णयाचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. चिखलठाण जि.औरंगाबाद येथील रहिवासी कै.विनायक सांडू साळुंखे यांची कन्या अनिता आणि चाळीसगाव येथील रहिवासी कै.वसंत दारकू गरुडकर यांचे चिरंजीव प्रकाश यांचा पुनर्विवाह शुक्रवार 20 जुलै रोजी उत्साहात पार पडला. गोंधळी समाजाचे अध्यक्ष रामभाऊ गायकवाड, उपाध्यक्ष संतोष सोनवणे, सचिव जयंत गायकवाड, सतिश पवार, बाळासाहेब गायकवाड आदींच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. रामभाऊ गायकवाड, विष्णु भिसे यांनी पुढाकार घेत आदर्शवत असा विवाह घडवून आणून समाजात एक नवी संकल्पना रुजविली या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.