भुसावळ : तालुक्यातील गोंभी फाट्याजवळ सांबर आडवे आल्याने त्यास वाचवण्याच्या प्रयत्नात चारचाकी झाडावर आदळून चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना 10 रोजी रात्री 12.05 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत तालुका पोलिसात किशोर रमेश माळी (जामनेर रोड, भुसावळ) यांनी खबर दिल्यावरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. माळी हे चारचाकी (क्रमांक एम.एम.19 डी.जे.6164) घेऊन जात असताना अचानक सांबर आडवे आल्याने वाहन झाडावर धडकल्याने मोठे नुकसान झाले. तपास हवालदार जिजाबराव पाटील करीत आहेत.