गोखले परराष्ट्र सचिव

0

नवी दिल्ली : भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांची जागा आता परराष्ट्र मंत्रालयातील अर्थविषयक सचिव म्हणून काम पाहणारे विजय गोखले यांनी घेतली आहे.

त्यामुळे आता भारताचे नवे परराष्ट्र सचिव गोखले हे असणार आहेत. 1981 बॅचचे आयएफएस अधिकारी विजय गोखले हे सध्या परराष्ट्र मंत्रालयात आर्थिक संबंधाचे सचिव आहेत. आता ते एस. जयशंकर यांची जागा घेणार आहेत. 28 जानेवारीला एस. जयशंकर यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने विजय गोखले यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे.