गोजोरे शाळेचा स्लॅब कोसळला; थोडक्यात बचावले विद्यार्थी

0

भुसावळ- तालुक्यातील गोजोरे जिल्हा परिषद शाळेतील 2 वर्गखोल्यांवरील स्लॅबचा काही भाग बुधवार 27 रोजी कोसळला परंतु शिक्षकांच्या सतर्कतेमुळे जिवीतहानी टळली. शाळेतील मुख्यध्यापकांनी ही बाब जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांना कळविली असता त्यांनी तात्काळ शाळेला भेट दिली.

सावकारे यांनी तात्काळ अभियंत्यांना बोलावून घेतले व लागलीच स्लॅब टाकण्यासाठीचे इस्टीमेट तयार करुन घेतले. तसेच ही बाब शिक्षण सभापती पोपट भोळे व शिक्षण अधिकार्‍यांना कळवली असता त्यांना तात्काळ भेट देण्याची विनंती केली.