गोजोर्‍यात चोरट्यांचा हेदोस, तीन लाखांच्या रोकडवर डल्ला

0

भुसावळ– तालुक्यातील गोजोरा येथील ग्रामपंचायतीच्या तीन गाळ्यांना चोरट्यांनी टार्गेट करीत सुमारे तीन लाखांची रोकड लांबवली. ज्ञानेश्‍वर तळेले यांच्या मालकीच्या साईबाबा पतसंस्थेच्या तिजोरीतील पावणेतीन लाखांची रोकड तर अन्य शेजारच्या दोन गाळ्यातील प्रत्येक दहा हजाराप्रमाणे रोकड गेल्याचे सांगण्यात आले. तालुका पालीस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन खामगड व सहकार्‍यांनी घटनास्थळी पाहणी केली. गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केल्याचे सूत्रांनी सांगितले. दुपारपर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.