भुसावळ- तालुक्यातील गोजोरा येथे जुन्या भांडणाच्या कारणातून वाद उफाळल्याने एकास लोखंडी पाईपाने मारहाण करण्यात आली. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार दिलीप रामा बाळा कोळी (35) यांना जुन्या भांडणाच्या वादातून संशयीत आरोपी राजू सदाशीव डोळे, सनी राजू डोळे, गजनान राजू डोळे, चंद्रकांत सोपान पाटील, भूषण प्रकाश कोळी यांनी लोखंडी पाईपाने मारहाण केल्याने त्यांचे डोके फुटले. या प्रकरणी पाचही आरोपींविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गावात शांतता असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.एन.होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास एएसआय अरुण जाधव करीत आहेत.