गोजोर्‍यात पतसंस्थेचे कार्यालय फोडले

0

भुसावळ- तालुक्यातील गोजोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे कार्यालय चोरट्यांनी बुधवारी रात्री फोडले मात्र सुदैवाने त्यात काही किंमती ऐवज नसल्याने काहीही चोरीस गेले नाही. बुधवारी सकाळी पतसंस्थेच्या कार्यालयाचे कुलूप तुटलेले दिसल्याने चेअरमन प्रभाकर तळेले यांना माहिती कळवण्यात आली. युवराज शंकर आस्वार यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एएसआय अरुण जाधव तपास करीत आहेत.