गोदरेज कन्झ्युमरचा निव्वळ नफा २३० कोटी

0

मुंबई | ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या (एफएमसीजी) गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस् लिमिटेडने (जीसीपीएल) ३० जून २०१७ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीचे आर्थिक निष्कर्ष रविवारी घोषित केले. आर्थिक वर्ष २०१८च्या पहिल्या तिमाहीत कामगिरी मिश्र स्वरूपाची राहिली, पण येणाऱ्या तिमाहीमध्ये मजबूत कामगिरीचे निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी कंपनी योग्य दिशेने दमदार पावले उचलीत आहे. दुसऱ्या तिमाहीत परिस्थिती सामान्य होईल, असा विश्वास जीसीपीएल च्या कार्यकारी, अध्यक्षा निसाबा गोदरेज यांनी व्यक्त केला.

त्या म्हणाल्या, भारतातील व्यवसायात दुय्यम विक्रीमध्ये ९% एवढी वाढ झाली आणि सर्व संवर्गांमध्ये कंपनीने बाजारपेठेतील हिस्सा सातत्यपूर्ण राखलेला आहे. मे आणि एप्रिलमधील विक्री मजबूत होती, तर वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीसाठी चॅनेल डिस्टॉकिंगमुळे जूनमधील विक्री कमी झाली. ग्राहकांकडून होणारी मागणी मात्र तरीही मजबूत राहिली.

‘गोदरेज’चा आंतरराष्ट्रीय व्यवसाय सातत्यपूर्ण चलन आधारावर ११% ने वाढला. आफ्रिकेतील क्लस्टर व्यवसायाने २६% स्थिर चलन वृद्धीसहित उत्तम कामगिरी केली. इंडोनेशियातील व्यवसायाने ११% सहित कमजोर कामगिरी केली, पण मॅक्रो-इकॉनॉमिकच्या सुधारणाऱ्या स्थितीसह यात हळूहळू सुधारणा होईल. त्याबाबत आगामी तिमाहींमध्ये वृद्धीची व्यापकता वाढवण्यासाठी आम्ही अनेक धोरणात्मक पावले उचलीत आहोत. कंपनीचा जाहिरातींवरील खर्च १३% ने वाढला, असेही निसाबा गोदरेज यांनी सांगितले.

अधिक जागरूक राहण्यासाठी, नवनवीन कल्पनांची गती वाढविण्यासाठी, बाजारपेठेच्या संपर्कात राहण्याचा आमचा दृष्टिकोन सुधारण्यासाठी आणि बाजारपेठेपेक्षाही सरस कामिगरी करण्यासाठी आमच्या महत्त्वपूर्ण अशा बुद्धिसंपदेमध्ये गुंतवणूक करण्यावर आम्ही सातत्याने लक्ष केंद्रित करीत आहोत, असे निसाबा गोदरेज यांनी स्पष्ट केले.

कामगिरी बाबत दृष्टिक्षेप
– आ.व. २०१८च्या १ल्या तिमाहीत भारतातील विक्री ६% ने १,१८६ कोटी रुपयांनी वाढली.
– आ.व. २०१८च्या १ल्या तिमाहीत ईबीआयटीडीए + ए ॲन्ड पी ५ % ने ३३७ कोटी रूपयांनी वाढले.
– आ.व. २०१८च्या १ल्या तिमाहीत निव्वळ नफा २ % ने १५० कोटी रूपयांनी कमी झाला.

आर्थिक दृष्टिक्षेप
– आ.व. २०१८च्या १ल्या तिमाहीच्या आर्थिक कामगिरीचा सारांश:
– आ.व. २०१८च्या १ल्या तिमाहीची एकत्रित स्थिर चलन विक्री वर्षागणिक ८% ने वाढली
– एका स्थिर प्रमाणावरील वृद्धीमुळे, भारतातील व्यवसायाची विक्री वर्षागणिक ६% वाढली.
– आंतरराष्ट्रीय व्यवसायाची विक्री स्थिर चलनावर आधारित वर्षागणिक ११% ने वाढली.
– आ.व. २०१८च्या १ल्या तिमाहीचे एकत्रित स्थिर चलन ईबीआयटीडीए + ए अॅन्ड पी २% ने घसरले.
– आ.व. २०१८च्या १ल्या तिमाहीचा एकत्रित निव्वळ नफा आणि ईपीएस, अपवादात्मक बाबींशिवाय, ९% ने घसरला.
– संचालक मंडळाने १००% एवढा अंतरिम लाभांश जाहीर केलेला आहे (प्रति भाग रू.१.००)