गोदरेज प्रॉपर्टीजला विकणार आर.के स्टुडिओ?

0

मुंबई : कपूर परिवार हा बॉलीवूडचा फिल्मी परिवार मनाला जातो . कपूर परिवाराने बॉलीवूडला दिग्गज आणि मोठे कलाकार दिले आहेत. राज कपूरपासून रणबीरपर्यंत कपूर कुटुंबीयांचा चित्रपटसृष्टीत मोलाचा वाटा आहे. राज कपूर यांनी स्थापन केलेला आर.के. स्टुडिओ अनेक हिंदी चित्रपटांच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण आहे. मात्र, हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबीयांनी घेतल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच समोर आल्या आहेत. आता या स्टुडिओच्या व्यवहाराची चर्चा गोदरेज प्रॉपर्टीजसोबत चालू असल्याचे म्हटले जात आहे.

शुक्रवारी कपूर कुटुंबीयांच्यावतीने एक नोटीस जारी करण्यात आली. ज्यामध्ये संबंधित भूखंडाच्या विक्रीसाठीचं मुल्य निर्धारित करण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली होती. आता गोदरेज प्रोपर्टीसोबत या व्यवहाराच्या चर्चा शेवटच्या टप्प्यात आल्या असल्याचे वृत्त समोर आले आहे. संपूर्ण कपूर कुटुंबाकडे असणाऱ्या भूभाग मालकी हक्कांच्या पडताळणीनंतर पुढील रितसर नोंदणी करण्यात येणार आहे. मात्र, कपूर कुटुंबीयांनी या व्यवहाराबद्दलची कोणतीही बातमी अद्याप उघड केली नाही.