गोदान एक्सप्रेसमध्ये प्रवासात तीन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू

0

जळगाव – अजमगड येथून मुंबईला लोकमान्य टिळक एक्स्प्रेसने जात असताना तीन महिन्याच्या मुलीचा रेल्वे प्रवासात मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 11 वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर उघडकीस आली. शिवांगी प्रदीप शर्मा असे मयत मुलीचे नाव आहे. प्रदीप शर्मा व पत्नी चंदा शर्मा हे कुटुंब उत्तर प्रदेशातील अजमगड येथून गोदाम एक्सप्रेसने मुंबईला जात होते. त्यांच्या तीन महिन्याची मुलगी शिवांगी ही आजारी होती. रेल्वे प्रवासात तिचा मृत्यू झाला. भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडी थांबल्यानंतर याबाबत लोहमार्ग पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार लोहमार्ग पोलीस गोविंद सहारे यांनी नातेवाईकांसह मृतदेह रुग्णालयात हलविला. याठिकाणी शवविच्छदेन करण्यात आले. मुलीच्या मृत्यूने आई प्रदीप तसेच आई चंदा यांनी एकच आक्रोश केला.